मुख्यमंत्र्यांनी कोळसा प्रदूषण संबंधित समस्या जाणून घेतल्या

0
195

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोंयचो एकवोटच्या बॅनरखालील शिष्टमंडळाच्या एमपीटी वास्को ते हॉस्पेट अशा डबल ट्रॅक रेल्वे लाईनसंबंधित तसेच कोळसा प्रदूषणासंबंधी समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी सदर विषयांवर सविस्तर अभ्यास करून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

पणजीतील पर्यटन भवनात संपन्न झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवळेकर यांना गोंयचो एकवोटच्या शिष्टमंडळाने पर्यावरण, डबल ट्रॅक रेल्वे लाईन प्रकल्पातील पारंपारिक  अर्थ व्यवस्था पैलू अशा विषय़ांची माहिती दिली.

कोळसा वाहतूकीसाठी डबल ट्रॅक रेल्वे लाईनमुळे पर्यटन आणि मच्छिमारी व्यवसायास बाधा पोचणार आणि स्थानिक लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्याचे पत्र गोंयचो एकवोटच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले. सदर शिष्टमंडळाने कोळसा वाहतूकीसाठी सुरू करण्यात येणा-या डबल ट्रॅक रेल्वे लाईनचे बांधकाम बंद ठेवण्याची मागणी केली.