मुख्यमंत्र्यांनी अकार्यक्षम मंत्री लोबो यांची उचलबांगडी करावी:शिवसेना

0
254
गोवा खबर:कचरा व्यस्थापन मंत्री  मायकल लोबो हे पद सांभाळण्यास अयोग्य आहेत अशी टिप्पणी लोकायुक्त निवृत्त न्यायाधीश पी.के.मिश्रा यांनी केली असल्याने कचरा व्यवस्थापन मंत्र्यांचाच कचरा केला असल्याची टीका गोवा शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे.
जी व्यक्ती एका प्रधीकरणाचे अध्यक्षपद सांभाळण्यास अयोग्य आहे ते राज्याच्या मंत्रीपदाला काय न्याय देतील? असा प्रतिप्रश्न करत मुख्यमंत्रांनी मायकल लोबो यांची मंत्रीपदावरून उचलबांगडी करून कचरा साफ करावा अशी मागणी कामत यांनी केली आहे.
 गोवा सरकारकडे  शिफारशी करणे व्यर्थ असल्याचे म्हणून लोकायुक्तांनी मुख्यमंत्री सावंत भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्यास उदासीन असल्याचा दाखला दिला आहे असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.
 लोबोंची उचलबांगडी करून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराला मुक संमती असल्याचा दावा खोडून काढावा अन्यथा स्वत:चे नाव बदलून करप्शन सावंत करावे, असे आव्हान दिले कामत यांनी दिले आहे.
तक्रारदार रोझ डीसोझा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. १७ सप्टेंबर रोजी लोकायुक्त मिश्रा यांनी सर्व आरोप मान्य करत उत्तर जिल्हा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मायकल लोबो यांच्यावर गैरकारभार आणि सुड घेतल्याचा ठपका ठेवला आहे. अशी व्यक्ती पद सांभाळण्यास अयोग्य असून सदर माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. पुढे लोकायुक्तांनी शिफारशी करणे व्यर्थ असल्याचेही नमूद केले आहे,यावरून सर्व काही स्पष्ट होते,याकडे कामत यांनी लक्ष वेधले.