मुख्यमंत्र्यांना कठपुतली म्हटल्या बद्दल भाजप कडून चोडणकर यांचा निषेध

0
1893
गोवा खबर:प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा उल्लेख कठपुतली असा केल्या बद्दल भाजपतर्फे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चोडणकर यांचा निषेध करण्यात आला.
भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी प्रसिद्धिपत्रक जारी करून चोडणकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांचे खंडन करत काँग्रेस नेतेच कसे कठपुतली आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
नाईक यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हातातले कठपुतली बाहुले होते याची आठवण चोडणकर यांना करून दिली आहे.नाईक म्हणतात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे त्यांच्या मंत्रीमंडळा मधील मंत्र्यांच्या हातची कठपुतली होते.त्यामुळे प्रत्येक वेळी खुर्ची वाचवण्यासाठी त्यांना दिल्लीत धाव घ्यावी लागत होती.
गेल्या 20 वर्षातील गोव्यातील काँग्रेसचे सगळे प्रदेशाध्यक्ष हे पार्टी हायकमांडच्या हातचे बाहुले बनले होते असे सांगून नाईक म्हणाले, गोवा काँग्रेसने दिल्लीतील आपल्या पक्ष मुख्यालयाला 2019 च्या निवडणुकांसाठी उमेदवार शोधण्यासाठी मदत करायला हवी.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या कर्तबगारीवर मुख्य बातम्यांमध्ये झळकता येत नसल्याने चिल्लर गोष्टी करून लोकांचे लक्ष वेधून घ्यावे लागत आहे.गोवा काँग्रेसने खर तर त्याची चिंता करायला हवी.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना या देशातील कुठल्याच प्रश्नांची जाण नसल्याचा आरोप करून नाईक म्हणाले,लोकशाहीच्या पवित्र मंदीरात पंतप्रधान मोदी यांना आलिंगन देऊन गांधी जो प्रकार केला तसला प्रकार लोफर लोक करतात .त्यांच्या सारख्या नेत्याच्या हातची काँग्रेस पार्टी कठपुतली बनली आहे.