मुख्यमंत्र्यांतर्फे मंत्रालयात वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण

0
770

 

 

 

गोवा खबर:विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पर्वरी येथील सचिवालयाच्या मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सावरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले.

वीर सावरकर यांना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सावरकर यांची प्रतिमा मंत्रालयात बसविण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, राष्ट्र उभारणीत व स्वातंत्र्य चळवळीत वीर सावरकरांचे असलेले योगदान व त्याग यांचा प्रसार करण्यासाठीच ही प्रतिमा बसविण्यात आली आहे.