मुख्यमंत्र्यांतर्फे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवाचा १ ऑक्टोबर रोजी शुभारंभ

0
348
  
गोवा खबर:राज्यातील ग्रामपंचायतींच्या आर्थिक पुनरुत्थान योजनेंतर्गत, “आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा” यासाठी सरकारतर्फे, कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ  उद्या १ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने केला जाणार आहे.
आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत, उच्च शिक्षण संचालनालय व जीपार्डतर्फे ग्रामपंचायतींच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या अभ्यासाचे काम हाती घेण्यात आले होते. राज्यातील सर्व १९१ पंचायतींची माहिती गोळा करणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि त्यांचे स्वतंत्र अहवाल तयार करणे, यासाठी २५ महाविद्यालयांचा सहभाग होता. हा कृती आराखडा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोअर टीममध्ये, उच्च शिक्षण संचालनालय, जीपार्ड आणि महाविद्यालयांचा समावेश होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, पूर्वी सांगितल्याप्रमाणेच, या उपक्रमाचे स्वरूप आहे.
उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा सार्वजनिक प्रशासन व ग्रामीण विकास संस्था (जीपार्ड) यांनी हा उपक्रम समन्वयीत केला आहे.
कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी, कृषी, पशुसंवर्धन, युवा व पौगंडावस्थेतील मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला व स्वयंसहाय्य गट, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, नैसर्गिक संसाधने, योजना व त्यांचे अभिसरण आणि सर्वसामान्य – सुशासन, या विभागांची निवड करण्यात आली होती.