मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोव्यातील नवा तारा गेराज इम्पेरियम स्टारचे उद्घाटन

0
731
Chief Minister, Dr Pramod Sawant inaugurates Goa’s newest star, Gera’s Imperium Star in the presence of Mr. Michael Lobo, Minister for Solid Waste Management & Rural Area Development ,Mr. Uday Madkaikar, Honourable Mayor of Paniji city and Mr.Kumar Gera- Chairman, Gera Developments

 

पाटो प्लाझा-गोवा येथे गेराचा इम्पेरियम श्रेणीतील सहावा प्रकल्प

गोवा खबर:भारतामध्ये जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारणीत एक अग्रणी रियल इस्टेट विकसक ब्रँड असलेल्या
गेराज डेवलपमेंट्सने हल्लीच गोव्यात गेराज इम्पेरियम स्टार हा आपला मैलाचा दगड ठरणार्या
प्रकल्पाचे उद्घाटन केले. गोव्यामध्ये इम्पेरियम श्रेणीतील हा ६वा प्रकल्प आहे. गोव्यातील
व्यावसायिक केंद्र असलेल्या पणजीतील व्यावसायिक क्षितिज गेराच्या इम्पेरियम श्रेणीतील
व्यावसायिक प्रकल्पांना बदलवून टाकले असून देशातील सर्वोत्तम साधनसुविधा येथे उपलब्ध
केल्या आहेत.

१९७०मध्ये या कंपनीच्या कामाचा प्रारंभ झाला आणि त्यानंतर गेराने अनेक महत्त्वाकांक्षी
व्यावसायिक प्रकल्प जलद गतीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आपला विशेष ठसा उमटवला आहे.
गेराज इम्पेरियम स्टार हा प्रकल्प पणजी-गोवा येथे व्यावसायिकदृष्ट्या केंद्रस्थानी स्थित आहे.
गोवाचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते २५ सप्टेंबर २०१९ रोजी गेराज
इम्पेरियम स्टारचे उद्घाटन करण्यात आले आणि व्यवसायासाठी हा प्रकल्प खुला झाल्याची
घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

कळ दाबताच पणजीच्या क्षितिजावर गेराज इम्पेरियम स्टार झळाळू
लागला. या भव्य उद्घाटन सोहळ्यास पणजीचे नगराध्यक्ष उदय मडकईकर, घन कचरा
व्यवस्थापन व ग्रामविकास विभागाचे मंत्री . मायकेल लोबो, या मान्यवरांची उपस्थिती
राहिली. विकसित होत असलेल्या प्रकल्पाच्या परिसरातील छोटे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार,
पुरवठादार यांच्याशी भागिदारी सहकार्य करत गेरा डेवलपमेंट्सने व्यावसायिक-सामाजिक परिसंस्था
विकसित करण्यावर भर दिलेला आहे. कंपनीच्या कार्यप्रणालीला सुसंगत अशी जागतिक दर्जाची
रचना, सुविधा आणि कार्यपूर्तता यामुळे गेराच्या प्रकल्पास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

प्रभावी व आधुनिक रचना आणि अत्याधुनिक साधनसुविधा यामुळे विविध प्रकारच्या
व्यावसायिकांच्या गरजांची पूर्तता करण्यास गेराज इम्पेरियम स्टार प्रकल्प सक्षम आहे.
याप्रसंगी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गेराज इम्पेरियम स्टार
प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी माझे मित्र व घनकचरा व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पत्तन
विकास आणि ग्रामविकास मंत्री  मायकेल लोबो, गेरा डेवलपमेंट्सचे चेअरमन श्री. कुमार गेरा

आणि पणजी शहराचे महापौर उदय मडकईकर यांच्यासह उपस्थित राहता आले याचा मला
आनंद आहे. या प्रकल्पामध्ये कार्यालये, गाळे खरेदी केलेल्या ग्राहकांचे मी अभिनंदन करतो. या
साऱ्या विकासामागे शासनाद्वारे चांगल्या पायाभूत साधनसुविधा उपलब्ध करत मोठे पाठबळ
दिल्यामुळे अशा प्रकारचा विकास होत आहे, हे आपण जाणून घेतले पाहिजे. चांगले रस्ते, पूल,
पाणी, वीज अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न राबवले जातात
आणि त्यामुळेच गेरा डेवलपमेंट्ससारखे विकसक पुढे येऊन रियल इस्टेट प्रकल्प उभारतात व
त्या माध्यमातून स्थानिक व्यवसायाच्या विकासाला प्रोत्साहन देतात. म्हणून राज्याच्या पायाभूत
सुविधांच्या विकासावर नेहमी भर देणारे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे योगदान नेहमीच
मोठे राहिले आहे. त्यांच्या द्रष्टे नेतृत्वाचा आपण सर्वांना मोठा लाभ झाला आहे. त्यांच्या
कार्यकाळात सुरू करण्यात आलेले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा
माझा ध्यास असून त्यादिशेने माझे प्रयत्न सुरू आहेत.

आपल्या सर्वच प्रकल्पांमध्ये ग्राहकांचा आनंद, त्यांचे समाधान पूर्ण होईल याबाबत आदर्श
कार्यप्रणाली राबववावी या गेरा डेवलपमेंट्सच्या वैशिष्ट्याचा मला यानिमित्ताने ठळकपणे उल्लेख
करावासा वाटतो. उच्च बांधकाम दर्जाबरोबरच पार्किंगसारख्या स्थानिक गरजांच्या पूर्ततेवर विशेष
भर दिल्यामुळे गोमंतकीय तसेच परराज्यांतील व्यावसायिकांनाही आकर्षित करणाऱ्या या मोठ्या
प्रकल्पातील ९० टक्के गाळे विक्री करण्यात ते यशस्वी झाले आहेत. स्थानिक व्यवसायाला
प्रोत्साहन देणाऱ्या प्रकल्पाला शासनाकडून भविष्यातही पूर्ण सहकार्य मिळेल अशी खात्री मी
यानिमित्ताने देऊ इच्छितो. व्यवसायासाठी सर्वंकष एक-खिडकी परवाना सुविधेची अंमलबजावणी
करत इज ऑफ डुइंग बिझनेसचे मानांकन वाढवण्यावर आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे.”

गेरा डेवलपमेंट्सचे चेअरमन कुमार गेरा म्हणाले, “गेराज इम्पेरियम स्टार या आमच्या
प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून गोव्यातील व्यावसायिक रियल इस्टेट क्षेत्राचे आकर्षण
उचांवण्यासाठी सकारात्मक योगदान देऊ केल्याचा आम्हाला अभिमान आहे. व्यावसायिकांना
अपेक्षित असलेला आरामदायीपणा, थाट आणि सुलभता देण्यावर आमचा नेहमीच भर राहिला
असून ग्राहकांच्या व्यवसायाची भरभराट होण्यासाठी एक प्रेरक म्हणून भूमिका बजावण्यासाठी
इमेरियम श्रेणीतील प्रकल्पांचा विकास करण्यात आलेला आहे. केवळ नवे मापदंड स्थापित
करण्यापुरतेच नव्हे तर गोव्याच्या राजधानीमध्ये असलेल्या व्यावसायिकतेचा सोहळा साजरा
करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.”
गेरा डेवलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक  रोहित गेरा म्हणाले, “गोव्यामध्ये गेराज
इम्पेरियम स्टार हा व्यवासायासाठी कार्यरत झाल्याची घोषणा करताना आम्हाला मोठा अभिमान
वाटत आहे. गोव्यातील व्यावसायिकांच्या अपेक्षा, गरजांचा अभ्यास करून या प्रकल्पाची संकल्पना
विकसित करण्यात आली होती आणि त्यानुसार त्याची इनसाइड-आउट अशी रचना करण्यात
आली आहे. आश्वासन आणि उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी एक कंपनी म्हणून आम्ही नेहमीच

कटिबद्ध राहिलो आहोत. जेव्हा आम्ही एखाद्या प्रकल्पाची संकल्पना आखतो व त्याचा विकास
करत असतो तेव्हा ग्राहकांना अधिकाधिक सुविधा व सेवामूल्य मिळेल हे आमचे मुख्य उद्दिष्ट
असते. या प्रकल्पाच्या उभारणीत मोठे श्रम, नियोजन आणि अनुभव कामी आला असून
व्यावसायिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरल्याचा आम्हाला विश्वास आहे.”
एक प्रगत, अग्रणी निवासी व व्यावसायिक गृहबांधणी प्रकल्प विकसक म्हणून गेरा डेवलपमेंट्सने
गोव्यातील व्यावसायिक केंद्र असलेल्या पाटो प्लाझा- पणजी येथे छोट्या व मध्यम स्वरूपातील
व्यावसायिकांसाठी आणखी एक प्रकल्प सादर करत गोव्यातील व्यवसायाचा विकासाला चालना
देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेराज इम्पेरियम स्टारमध्ये ५००० चौरस मीटर क्षेत्रफळावर दुकानांसाठी गाळे, व्यावसायिक
कार्यालये, फूड कोर्ट यासाठी व्यावसायिक जागा उपलब्ध आहेत. या प्रकल्पामध्ये एकूण ३२५
गाळे असून यातील ९५ टक्के गाळ्यांची विक्री पूर्वीच झालेली आहे. या आठ मजली, बहुउद्देशीय
प्रकल्पामध्ये गोव्यातील व्यावसायिकांच्या गरजांची पूर्तता करण्याबाबतची रचना, सुविधा व सेवा
सादर करण्यात आल्या आहेत.

देशातील अनेक बाजारक्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या या रियल्टी डेवलपरच्या अभ्यासानुसार
गोव्यात मोठ्या व्यवसाय संधी उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना एक परिपूर्ण व्यावसायिक
परिसंस्था उपलब्ध करत परिसरातील लोकांना व व्यवसायांना दीर्घकालीन मूल्यसेवा देण्यासाठी हा
प्रकल्प कार्यरत राहील असा गेरा डेवलपमेंट्सला विश्वास आहे.