मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  विद्यार्थ्यांसाठी बससेवेचा शुभारंभ

0
674

गोवा खबर:डिचोली येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या कदंब बस वाहतूक सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळीत करण्यात आला.

कदंब बसगाडीच्या सेवेमुळे साखळी पचक्रोशीतील विद्यार्थ्यांची  चांगली सोय झाली असून पालक वर्गातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते.