मुख्यमंत्र्यांच्या लेकिला अनुभवायची होती विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासामधील डिबेट

0
2021
गोवा खबर:माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा वारसा चालवत मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतलेल्या डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने यांना आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडायचा असल्याने गेले दहा दिवस त्यांनी लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर केले होते.त्याचा फटका खुद्द त्यांच्या लेकीला सुद्धा बसला.29 जानेवारीपासून ती आपल्या लाडक्या पापाला भेटू शकली नव्हती.आज मात्र तीने आपल्या शाळेमधील मैत्रिणीं सोबत विधासभेत हजेरी लावत अखेर पापाची भेट घेतली.मात्र विरोधकांनी गोंधळ  घातल्या नंतर कामकाज तहकूब झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या लेकिला अनुभवता आली नाही प्रश्नोत्तराच्या तासामधील डिबेट.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गेल्यावर्षी आजाराशी झुंज देत असताना देखील अर्थसंकल्प सादर केला होता.पर्रिकर यांच्या पश्चात मुख्यमंत्री पदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प सादर करताना अपेक्षाचे ओझे आणि राज्याच्या विकासाला गती देण्याचे आव्हान होते.

मुख्यमंत्री गेल्या महिन्यापासूनच अर्थसंकप्लाची तयारी करण्यात व्यस्त होते.त्यांनी संबंधित घटकां सोबत बैठकांचा सपाटा लावला होता.शेवटी शेवटी त्यांनी आपण अर्थसंकल्प बनवण्यात व्यस्त असल्याने लोकांसाठी उपलब्ध नसणार असे देखील जाहीर केले होते.
अर्थसंकल्प तयार करत असताना दिल्ली येथे प्रचारासाठी बोलावणे आल्यामुळे वेळात वेळ काढून त्यांनी दिल्ली येथे जाऊन प्रचार सभा देखील घेतल्या होत्या.या गडबडीत 29 जानेवारी पासून आजपर्यंत त्यांना आपली लाडकी लेक असलेल्या पार्थिवीची भेट घेता आली नव्हती.कधीतरी रात्री बारा किंवा एक वाजता एखादा फोन करून डॉ. सावंत आपल्या लेकीची खुशाली घेत होते.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता.आज मुख्यमंत्री थोडेसे रिलॅक्स होऊन आपल्या लेकीला भेटण्याची शक्यता होती.मात्र लेकीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यां सोबत विधानसभेचे कामकाज बघण्यासाठी हजेरी लावत पापा मुख्यमंत्री म्हणून सभागृहात कसे काम करतात याचा अनुभव घेतला.
सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी रोहन खंवटे यांच्या अटकेवरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केल्या नंतर सभापतींनी कामकाज दुपारी साडे बारापर्यंत तहकुब केले. त्यानंतर काही वेळाने सभागृहात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी गॅलरीत बसलेल्या कारापुर- साखळी येथील डॉ. के.बी.हेडगेवारच्या विद्यार्थ्यांना हाय, हॅलो केले. अगदी आस्थेने तुमचे सर,टीचर कुठे गेले अशी विचारणा देखील केली.याच शाळेत सातवी मध्ये त्यांची लेक शिकत आहे. तेवढयात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि इतर सहकारी मुख्यमंत्र्यां जवळ आले. त्यावेळी बोलता बोलता त्यांनी आपली लेक देखील आज आली असल्याचे त्यांना सांगितले.एवढेच नव्हेतर तिला   उभी रहायला सांगून त्यांनी  ती नेमकी कोण हे देखील दाखवून दिले.
अधिवेशन संपता संपता कामकाज बघायला आलेले विद्यार्थी ज्या मतदारसंघातून आलेत त्यांचा आमदार किंवा मंत्री त्यांच्या सोबत ग्रुप फोटो काढतो.आज साखळी मतदारसंघातील विद्यार्थी असल्याने साहजिकच त्यांचा मुख्यमंत्र्यां सोबत फोटो काढला जाणे नक्की होते.याच फोटो वेळी मुख्यमंत्री आपल्या लेकीला भेटले. लेकीला तर आपल्या पापां सोबत स्वतंत्र फोटो हवा होता.मुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यां सोबत फोटो काढून झाल्यानंतर तिला होकर दिल्या नंतर तिच्या चेहऱ्यावर हसू फुलल.
या भेटीबद्दल मिसेस मुख्यमंत्री सुलक्षणा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या,29 जानेवारी पासून पार्थिवी पापाला भेटलेली नाही.तिचे पापा रात्री एकदा फोन करून तिची खुशाली घेत असतात.आज पार्थिवीच्या शाळेतील विद्यार्थी विधानसभेचे कामकाज बघण्यासाठी गेल्यामुळे बाप लेकीची भेट झाली.लेक इतकी खुश होती कि तिला स्कूल बस मधून इतर विद्यार्थ्यां सोबत परत न येता पापा बरोबर थांबायच होत. तिने फोन करून मला त्याची कल्पना दिली.पापा दहा दिवसांनंतर भेटल्यामुळे लेक मात्र भलतीच खुश आहे एवढ मात्र नक्की.
पार्थिवीला सत्ताधारी आणि विरोधकांमधील रंगणारा प्रश्नोत्तरांचा तास अनुभवायचा होता.मात्र आज आमदार खंवटे यांच्या अटकेच्या प्रकरणावरुन विरोधक सभापतीं समोरील हौद्यात गेले त्यामुळे सभागृहात दुपारी साडे बारा पर्यंत काही कामकाज होऊ शकले नाही.त्यामुळे पार्थिवी नाराज आहे.विरोधकांनी सभापतींच्यां आसना समोरील हौद्यात जाऊन घातलेला गोंधळ देखील पार्थिवीला अजिबात आवडला नाही,अधिवेनाचे काम संपल्या नंतर आपल्याशी बोलताना पार्थिवीने आज आपण नाखुश झाल्याचे आपल्याला सांगितल्याचे मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या.
विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यामुळे मुख्यमंत्री जनतेसाठी आणि कुटुंबासाठी आता उपलब्ध असतील आणि त्यांचे प्रश्न सोडवतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.