मुख्यमंत्र्यांच्या बर्थ-डे पार्टिची चौकशी करुन कारवाई करा : अमरनाथ पणजीकर

0
1261
गोवा खबर : गोव्यातील भाजप सरकारातील मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आझिलो इस्पितळात बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी करुन बेजबाबदारपणाची हद्द ओलांडली आहे. त्यांनी आता खुर्ची सोडणे हेच राज्याच्या हिताचे आहे. केवळ आपली जाहिरातबाजी करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी पोरखेळ चालवला आहे. जनतेच्या जीवाशी खेळुन ते प्रसिद्धी मिळवीण्याचा प्रयत्न करीत आहेत,असा आरोप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

कोरोना संकटामूळे आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यानी त्या दिवशी म्हापसा येथिल सरकारी आझिलो इस्पितळाला भेट दिली व बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी केली,याकडे लक्ष वेधून पणजीकर म्हणाले, दहा वर्षापुर्वी आपण वैद्यकिय सेवा सोडली होती हे त्यानीच तेथे उपस्थित पत्रकार व इतरांना सांगीतले. याचा सरळ अर्थ म्हणजे मुख्यमंत्र्यानी  केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच तेथे रुग्णांची तपासणी केली हे स्पष्ट होते.
पणजीकर म्हणाले,मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सरकारी वैद्यकिय पेशा सोडला  आहे. त्यांना आझिलो इस्पितळात रुग्णांना तपासण्याची परवानगी कोणी दिली याची चौकशी झाली पाहिजे. वकिलीचे शिक्षण घेतलेला एखादा सत्ताधारी  मंत्री वा आमदार न्यायाधिशाच्या खुर्चित जसा बसु शकत नाही, त्याच प्रमाणे केवळ नावापुढे डाॅक्टर लावले म्हणुन मुख्यमंत्री सरकारी इस्पितळात रुग्ण तपासणी करु शकत नाहीत.
आझिलो इस्पितळात मुख्यमंत्र्यासोबत मंत्री मायकल लोबो हजर होते. परंतु या सर्वांनी तेथे शारिरीक अतंर ठेवण्याची दखल घेतली नाही,असे सांगून पणजीकर म्हणाले, पत्रकार व लोकांशी बोलताना मुख्यमंत्र्यानी आपला मास्क तोंडावरुन खाली उतरवले होता. या कृतीने त्यांनी इतरांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे. मंत्रीमंडळ बैठकित मुख्यमंत्री व इतरांनी मास्क व शारिरीक अंतर ठेवले नव्हते. त्यामुळे काॅंग्रेसपक्ष व जनतेने सरकारवर टिका केली होती. परंतु मुख्यमंत्र्यानी त्यातुन काहिच बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
संपुर्ण जगात कोरोनाचे संकट असताना, भाजपचे मंत्री, आमदार व पदाधिकारी केवळ प्रसिद्धी मिळवीण्याच्या मागे लागले आहेत. मुख्यमंत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी  केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक, माजी मंत्री दिलीप परुळेकर यांना निमंत्रीत करुन जोरदार पार्टिचे आयोजन केले होते हे समाजमाध्यमांवरील फोटो व व्हिडीयोवरुन उघड झाले आहे. हरमल येथिल विदेशींच्या रेव्ह पार्टिची चौकशी करण्याचा स्वागतार्ह निर्णय मुख्यमंत्र्यानी घेतला आहे. त्याच प्रमाणे स्वतःच्या वाढदिवस पार्टिच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यानी देणे गरजेचे आहे,अशी मागणी पणजीकर यांनी केली.
गोमंतकीय जनता भाजपच्या बेगडी राजकारणाला कंटाळली आहे. जुमलेबाजाना परत सत्तेवर येण्यास गोमंतकीय कदापी देणार नाहीत,अशी टिका देखील पणजीकर यांनी केली आहे.