मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी वाढदिनी महालक्ष्मी मंदिरात देवीला साकडे

0
1171
गोवा खबर: मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे आजारपणामधून बरे होऊन पुन्हा पहिल्या प्रमाणे गोमंतकीयांच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांसह हितचिंतकांनी आज पणजी येथील देवी महालक्ष्मीला साकडे घातले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या 63 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हितचिंतकांनी त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि ते पुन्हा नव्या जोमाने कामास लगावे यासाठी पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात पुजेचे आयोजन केले होते.
आज सकाळी पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले.पर्रिकर हे महालक्ष्मीच्या आशीर्वादाने लवकरच बरे होऊन पुन्हा कामास लागतील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.पूजे नंतर भाजप कार्यालयात रक्तदान शिबिराचे आजोजन करण्यात आले होते.त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटर वरुन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मोदी यांनी पर्रिकर यांना मित्र म्हणून शुभेच्छा देत असल्याचे म्हणताना त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले आहे.पर्रिकर लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.