मुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळेच कर्नाटकची हिंम्मत वाढली:शिवसेनेचा आरोप

0
894

गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटक भाजप अध्यक्ष येडीयुररप्पा यांना लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊनच बंद ठेवण्यात आलेल्या कालव्याचे काम कर्नाटक सरकारने परत चालू करण्यात आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याला पुर्णपणे पर्रीकर जबाबदार असल्याचा आरोपही गोवा शिवसेनेने केला आहे. कर्नाटकाच्या वागणुकीचा शिवसेना विरोध करत असल्याचे गोवा राज्य शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांच्या कथित वादग्रस्त विधाना वरुन गोवा आणि कर्नाटक मधील संबध विकोपास गेले आहे.पालयेकर यांनी कन्नडींगांसंदर्भात वापरलेल्या कथित अपशब्दाचे पडसाद कर्नाटक मध्ये उमटू लागले आहेत.कर्नाटकच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत गोवा सरकारची कोंडी करण्याची भूमिका घेतली आहेत.तणावाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या कदंबच्या बसेस खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या आहेत.परिस्थिति सुधारली तर सरकारचा सल्ला घेऊन बसेस पुन्हा सुरु केल्या जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
 दरम्यान या वादात आता शिवसेनेने उडी घेत हे प्रकरण चिघळण्यास मुख्यमंत्री पर्रिकर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
 शिवसेना शिष्टमंडळाने रविवारी कणकूंबी येथील म्हादई नदीवर कर्नाटक सरकार उभारत असलेल्या  कळसा-भंडुरा प्रकल्पाची पाहणी केली.शिवसेनेच्या शिष्टमंडळात गोवा राज्यप्रमूख शिवप्रसाद जोशी, उपराज्यप्रमूख जितेश कामत, उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव, पदाधिकारी मंदार पार्सेकर, परीमल पंडित आणि सुरज वेर्णेकर  सहभागी झाले होते. कणकूंबीहून चिंगुळी ह्या गावी जाणाऱ्या रस्त्यावर माऊली मंदिराच्यालगत असलेल्या कर्नाटकातील मलप्रभा नदिच्या उगमस्थानाची पहाणीही शिष्टमंडळाने केली. तिथल्या गावातील लोकांशी आणि शेतकऱ्यांशी या शिष्टमंडळाने संवाद साधला. या पाहणी नंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी म्हणाले, कळसा कालव्याचा जेथे काम सुरु आहे त्यांना काहीच फायदा नसल्याचे आढळून येत आहे. या प्रकल्पासाठी त्यांच्या शेतजमिनी उध्वस्त झाल्यामुळे बहुसंख्य ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. कालव्याच्या कामामुळे माऊली देवळाचा मंडप जमिनदोस्त झाला आणि गावातील कित्येक घराना भेगा पडल्या असून कालव्याचा बहुतांश भाग जमिनीच्या खालून भुयारीमार्गे नेण्यात आला आहे. कर्नाटक सरकारच्या कारभारावर बहुतेक गावकर्‍यांनी नाखुशी व्यक्त केली आहे असे उपराज्यप्रमुख जितेश कामत यांनी निदर्शनास आणून दिले. कालव्याचे काम सुरू असून जवळ जवळ पुर्ण होण्याच्या मार्गावर असून गोव्याकडे येणारे थोडे पाणी कालव्यात घुसत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊनच बंद ठेवण्यात आलेल्या कालव्याचे काम परत चालू करण्यात आले असल्याची शक्यता नाकारता येत नसून ह्याला पुर्णपणे पर्रीकर जबाबदार असल्याचा आरोपही कामत यांनी केला आहे. कर्नाटकाच्या वागणुकीचा शिवसेना विरोध करत असल्याचे गोवा राज्य शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
म्हादाई पाणी वादात आडमुठी भूमिका घेणाऱ्या गोवा सरकारला आर्थिक कोंडीत पकडा अशी मागणी कन्नड संघटनांनी जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांच्या कडे केली.
बेळगावातील सर्किट हाऊस येथे कन्नड संघटनांनी भेट घेऊन सदर मागणी केली आहे.गोव्याचे मंत्री विनोद पालेकर यांनी कन्नडीगा विरुद्ध अपशब्द वापरल्याने त्यांच्या वर क्रिमिनल केस दाखल करा आणि बेळगाव हुन गोव्याला दररोज जाणारी भाजी दूध पुरवठा बंद करा अशी मागणी कन्नड संघटनांनी केली आहे.
कर्नाटकातुन गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर असून हे रोखण्यासाठी  कर्नाटक सरकारने  दांडेली सह इतर पर्यटन स्थळांचा विकास करावा अशी मागणी देखील कन्नड संघटनांनी केली आहे.अशोक चंदरगी,महादेव तलवार गणेश रोकडे आदी उपस्थित होते