मुख्यमंत्र्यांच्या जीएसटी उत्तरावर शिवसेना असमाधानी

0
933

गोवा:गोव्याची पारंपरिक कला असलेल्या तियात्रावरील जीएसटी रद्द करण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही समाधानी नसुन गोव्यातील सगळ्या कलांना जीएसटी पासून मुक्त ठेवावे अशी मागणी शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नाईक म्हणाल्या,मुख्यमंत्र्यांनी आमच्या पत्राला उत्तर दिले याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने मात्र आमचे समाधान झाले नाही.तियात्रा मधील सगळ्याच घटकांना जीएसटी लागू झालेली नाही असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी ते उत्तर समाधानकारक नाही.तियात्र गोव्याची पारंपरिक कला असून तियात्र हे जीएसटी पासून मुक्त करावे अशी शिवसेनेची मागणी असून आम्ही त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत.मुख्यमंत्र्यांना कल्पना असून देखील त्यांनी तियात्र क्षेत्रामधील लोकांना विश्वासात घेतले नाही हे दुर्दैव आहे.अल्पसंख्यांक समाजा मसीहा समजणाऱ्या विजय सरदेसाई हे देखील सगळ समजून गप्प असून आम्ही त्यांचा निषेध करतो असे नाईक म्हणाल्या.तियात्रच नव्हे तर गोव्यातील सगळ्या कला जीएसटी मुक्त कराव्यात अशी शिवसेनेची मागणी असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष मायकल कारस्को उपस्थित होते.