मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांचा गट सांभाळणार कारभार

0
905
गोवाखबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपचारासाठी जास्त दिवस हॉस्पिटल मध्ये राहिले तर कार्यकारी मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा रंगात आलेली होती.आज त्याला पूर्ण विराम मिळाला. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैर हजेरीत प्रशासकीय कामे खोळंबू नये यासाठी सार्वजनीक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर,नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा या 3 वरिष्ठ मंत्र्यांच्या गटाकडे सर्वाधिकार सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे.या गटाल 5 कोटी रूपयां पर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.