मुख्यमंत्र्यांची तब्बेत स्थिर: मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

0
1327
 गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने एका ट्वीट द्वारे दिली आहे.

मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती अचानक बिघडली असल्याच्या बातम्या येऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने हा खुलासा केला आहे.त्यात मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांचे सगळे हेल्थ पॅरामीटर स्टेबल असल्याचे स्पष्ट केले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती चिंताजनक बनल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.या पार्श्वभूमीवर पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर,भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांनी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी धाव घेतली.
 मुख्यमंत्री पर्रिकर यांना भेटून आल्या नंतर पत्रकारांशी बोलताना कुंकळ्येकर यांनी देखील आपण आताच मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतली असून त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे सांगितले.