मुख्यमंत्र्यांकडे खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी;अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

0
231
गोवा खबर:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मेसेज पाठवून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या  अज्ञाता विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
अज्ञात व्यक्ती 1 नोव्हेंबर पासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या खाजगी मोबाइलवर मेसेज पाठवून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देत होता.हा प्रकार तीन, चार दिवस सुरु होता.त्याची गंभीर दखल घेत पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे ओएसडी आत्माराम बर्वे यांनी 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा पणजी पोलिस स्थानकाला मेल पाठवून याबाबत तक्रार केली.त्याच दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी त्यावर अज्ञाता विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरु करण्यात आला.आज या तक्रारीची माहिती लोकांसमोर आली.
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी बर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.