मुख्यमंत्र्यांकडून नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

0
112

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे नवरात्रोत्सव प्रतीक असल्याचे सांगितले आहे. जगातील सर्व लोक हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करतात.

सर्व वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी माँ दुर्गाने महिषासुरसारख्या राक्षसाशी लढा देऊन आपली भूमी मुक्त केली आहे. माँ दुर्गासाठी हे नऊ दिवस समर्पित आहेत आणि त्यानुसार सांस्कृतिक आणि पारंपरिक रीतिरिवाजांनी आणि कार्यक्रमाद्वारे हे नऊ दिवस साजरा केले जातात.

या कोविड-19 महामारीच्या कठीण प्रसंगी या समस्येवर मात करण्यासाठी मी माँ दुर्गाकडे बळ आणि धैर्यासाठी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.