मुख्यमंत्र्यांकडून घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा

0
436

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना गोवा घटक राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ३० मे हा गोव्यातील इतिहासाचा एक अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे. यादिनी म्हणजे १९८७ साली गोवा हे भारतीय संघप्रदेशाचे पूर्ण दर्जाचे राज्य बनले होते. घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्याने सामाजिक-आर्थिक विकासाला आणि सांस्कृतिक प्रगतीला गती देण्यासाठी राजकीय जबाबदारी अधिक वाढली.

कोविड-१९ महामारीच्या संकट काळात गोव्याने पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी लोकांमध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी राज्य प्रशासन जागरूक आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.

आपण एकत्र येऊन सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे चालूच ठेऊन तसेच सामाजिक अंतराचे पालन करून आणि मास्कचा वापर करून कोरोना व्हायरसविरूध्द लढा देऊन आपली एकता बळकट करूया. त्याचबरोबर आपण गोव्याच्या कल्याणासाठी आणि भरभराटीसाठी एकत्र काम करूया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.