मुख्यमंत्र्यांकडून क्लस्टर विकास बैठकीचा आढावा

0
167

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उध्योजकता मंत्रालयाच्या स्फूर्ती योजनेखाली आत्मनिर्भर भारत, स्वंयपूर्ण गोवासाठी कृषी उत्पन्न विकास क्षेत्राची (क्लटर) आढावा बैठक घेतली. रोजगार निर्मिती, महसूल वाढ आणि सक्षम अर्थव्यवस्था यासाठी राज्यातील कृषी आणि फलोत्पादन कार्याला प्रोत्साहन  देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

स्फूर्ती योजनेखाली गोव्यात विकसित करण्यात येणा-या विविध क्लस्टरवर बैठकीत चर्चा करण्यात आली. रोजगार निर्मितीसाठी भात पीक प्रक्रिया, गोमंतकीय मल्टी फ्रुट्स प्रोसेसिंग, नारळ आणि काथा, स्पाईस आणि हर्बल, स्वंयमदत गटातर्फे अन्न प्रक्रिया, पॉटरी, शुगरकेन जॅगरी, खोला मिरची, भाजी पाला अशा कृषी क्षेत्रात विकास घडवून आणण्यात येईल.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विविध सरकारी खाते आणि संस्थांना अंमलबजावणीत संस्था म्हणून तर संघटनाना विकसीत करण्यात येणा-या योजनांना गती देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडथळ्यांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली आणि या समस्या सोडविण्यासाठीच्या विषयावरही चर्चा करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील टाईम या तांत्रिक संस्थेने नियोजित क्लस्टरवर प्रेजेंटेशन सादर केले.

कृषी संचालक श्री. नेविल आल्फोन्सो, उध्योग संचालक श्री दिपक बांदेकर, टाईमचे सीईओ श्री राजेंद्र शिंदे, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदिप सरमुकादम आणि संबंधित खात्यातील इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते.

नावेली-१६ जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर

सासष्टी तालुक्यातील नावेली १६- जिल्हा पंचायत मतदार संघाचे  उमेदवार श्री. जुझे सांता रिता कोयल्हो यांचे दिनांन ०८ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाल्याने संबंधित जिल्हा पंचायत मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.