मुख्यमंत्र्यांकडून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

0
748

 

 गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषतः मुस्लीम बांधवाना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

       आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, उपवास आणि प्रार्थना करून या पवित्र रमजान महिन्याचा समारोप होतो. तसेच रमजान सणाने बंधुत्व, बंधुता आणि सलोख्याची भावना वाढीस लागते. मुख्यमंत्र्यांनी स्वताचे आरोग्य सांभाळून हा सण साजरा करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.