ताळगाव येथे नोकरी मेळा
गोवा खबर:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ऑक्टोबर १९, २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता, ताळगांव समुदाय केंद्र, ताळगांव येथे नोकरी मेळा २०१९चे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी कामगार मंत्री श्रीमती जेनिफर मॉन्सेरात याही उपस्थित राहतील.
नोकरीच्या संधी वाढविण्यासाठी आणि भरती करणार्यांना निवडीची व्यापकता पुरवण्यासाठी हा मेळा आयोजित केला गेला आहे. सीआयआय, जीसीसीआय, असोकेम, जीटीए, एनाअयपीएम आणि बीएनआय यांच्या संयुक्त विद्यमाने, कामगार आणि रोजगार आयुक्तांचे कार्यालय, प्रादेशिक रोजगार विनिमय केंद्र हा नोकरी मेळा आयोजित केला आहे.