मुख्यमंत्री सोमवार पासून होणार कामावर रुजू

0
1063

गोवाखबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा व्हावी यासाठी पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात काल होम हवन करण्यात आले.पर्रिकर यांचे चिरंजीव अभिजीत,आमदार प्रवीण झांट्ये,माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्यासह पर्रिकर यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज पणजी येथील मेरी ईम्याक्युलेट चर्च मध्ये सकाळी 11 वाजता पर्रिकर यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना होणार आहे.
स्वादू पिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या पर्रिकर यांच्यावर गेले 8 दिवस मुंबई मधील लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते.काल त्यांनी डिस्चार्ज घेऊन विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला होता.पर्रिकर सध्या त्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सोमवार पासून पर्रिकर पणजी येथील सरकारी निवासस्थानातून सरकारी काम सुरु करणार आहेत.प्रकृती पूर्ण सुधारे पर्यंत पर्रिकर लोकांशी असलेला जनसंपर्क बंद ठेवणार आहेत.गोव्यात आणि मुंबई मध्ये त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.