मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या कृती दल समितीच्या १०० व्या बैठकीत लाभधारकांना मंजुरी पत्रांचे वितरण

0
263

 

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या कृती दल समितीच्या १०० व्या बैठकीस उपस्थिती लावली आणि पणजीतील ईडीसी हाऊसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी एकूण सात लाभधारकांना मंजूरी पत्रे वितरीत केली. या योजनेखाली ईडीसीने सुमारे ६६ इतर लाभधारकांना मंजूरी दिली आहे.

  ईडीसीचे अध्यक्ष  सदानंद शेट तानावडे, व्यवस्थापकीय संचालक  किरण बाळ्ळीकर आणि कृती दल समितीचे अध्यक्ष सातार्डेकर हेही यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ईडीसी आणि ईडीसीच्या कर्मचा-यांनी केलेल्या  समर्पित कार्याची प्रशंसा केली. नेहमी नफ्यात राहिलेले ईडीसी हे एकमेव महामंडळ आहे आणि महामारीच्या काळात सदर महामंडळाने सरकारला आर्थिकदृष्ट्या मदत केली आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली आतापर्यंत-महामंडळाने कर्ज उपलब्ध करून सुमारे ७ हजार गोमंतकीयांना प्रोत्साहित केले आहे.

पाटो प्लाझा विकसीत करून पायाभूत सुविधा वाढविण्यास ईडीसीने महत्वाची भुमिका बजाविल्य़ाचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कर्मचा-यांनी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.

 आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना अध्यक्ष  तानावडे यांनी रिक्रियेशनल हब बनविण्यासाठी पाटो येथील वापरात नसलेली जमीन वापरात आणण्याचा ईडीसीचा विचार असल्याचे सांगितले. या जमिनीचा वापर सध्या कचरा टाकण्यासाठी करण्यात येत असून गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे लवकरच ही जमीन स्वच्छ करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे रिक्रेयेशन हब म्हणजे पर्यटकांचे आकर्षण ठरेल. या हबमध्ये प्ले विभाग, गोमंतकीय खाध्य आणि पाकसंस्कृती आणि हस्तकला स्टॉल्स असतील. या हबमुळे गोमंतकीय युवकांना रोजगार मिळेल आणि गोमंतकीय उध्योजकांना व कारागिरांना प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.

सुरवातीस  आंगले यांनी रिक्रियेशन सेंटरसंबंधी पॉवर पॉईट प्रजेंटेशन दिले. पठाण यांनी मुख्यमंत्री रोजगार योजनेची संपूर्ण माहिती दिली. गाला इंडिया प्रा. लिमिटेडच्या कर्मचा-याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या.