मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तपासणीसाठी दिल्लीस रवाना

0
1069
 गोवा खबर:3 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सुप वाजताच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर नियमित तपासणीसाठी दिल्लीस रवाना झाले आहेत.

आजारी असून देखील मुख्यमंत्री पर्रिकर यांनी 3 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली होती.30 रोजी त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता.आज दिवसभर चाललेल्या कामकाजात मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता.

 गंभीर स्वरूपाच्या आजाराचा सामना करत असताना देखील तिन्ही दिवस विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री  पर्रिकर यांनी देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.गुरुवारी दुपारी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पर्रिकर यांची विधानसभेत भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे.बुधवारी अर्थसंकल्प मांडलेले  मुख्यमंत्री पर्रिकर आज बुधवारी 12 च्या सुमारास विधानसभेत पोचले.त्यानंतर आयएनएस मांडवी येथे नियोजित कार्यक्रमासाठी आलेले लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी तेथून थेटपणे विधानसभा गाठुन मुख्यमंत्री  पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. जेमतेम 5 मिनिटात पर्रिकर यांची भेट घेऊन रावत आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघुन गेले.आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.बाकी काही विषय नव्हता,असे रावत यांनी पर्रिकर यांची भेट घेऊन परत जाताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अचानकपणे विधानसभेत येऊन मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतली होती.राहुल गांधी यांनी या भेटी नंतर केरळ येथे केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.त्याभेटीवरुन सध्या गांधी आणि पर्रिकर यांच्यात पत्रयुद्ध सुरु झाले आहे.
काल सायंकाळी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मुलगी प्रतिभा सोबत मुख्यमंत्री पर्रिकर यांची त्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.

14 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील एम्स मधून डिस्चार्ज मिळाल्या नंतर गोव्यात परतले होते.गोव्यात आल्या पासून पर्रिकर आपल्या खाजगी निवास्थानी उपचार घेत आहेत.जानेवारी पासून त्यांनी मंत्रालयात येऊन काम करण्यास सुरुवात केली आहे.मांडवी नदी वरील तिसऱ्या पुलाच्या उद्धाटन सोहळयाला हजेरी लावत सार्वजिनिक कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे.आज संपलेल्या अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी ते उपस्थित होते.