मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोविडची लागण

0
314
गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोविडची लागण झाली आहे.सोशल मीडियावरुन त्यांनी याची माहिती दिली आहे.मुख्यमंत्री सावंत यांनी होम आइसोलेशनचा पर्याय निवडला आहे.

आपल्या संपर्कात आलेल्याना त्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.सध्या आपण घरातूनच काम पाहणार आहोत,असे त्यांनी सोशल मीडियावरुन कळवले आहे.
मुख्यमंत्री मंत्रीमंडळातील मंत्री,आमदार,सचिव आणि इतर अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असतात. मुख्यमंत्री सावंत कोविड पॉझिटीव्ह झाल्याने त्याच्या सोबत वावरणाऱ्या सर्वांना आपली तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोविडची लागण झाल्यामुळे त्यांच्या सोबत मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारे कर्मचारी होम आइसोलेशन मध्ये राहणार आहेत.त्याशिवाय पुढील सूचना येईपर्यंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सोबतच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.महत्वाच्या कामासाठी ईमेल आणि व्हाट्स एप्प नंबर जाहिर करण्यात आले आहेत.