मुख्यमंत्री पुढील उपचारासाठी अमेरिकेस रवाना

0
862

 

गोवाखबर: उपचारासाठी मुंबईत गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरपुढील उपचारासाठी आज पहाटेच्या विमानाने अमेरिकेला

रवाना झाले आहेत.मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव रूपेश कामत यांनी याबद्दल काल प्रसिद्धि पत्रक काढून माहिती दिली होती.

 मुंबईत लीलावती इस्पितळात त्यांनी परवा संध्याकाळपासून उपचार घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आज पहाटे त्यांनी
अमेरिकेला प्रयाण केले. सुमारे २२ ते २३ तासाचा विमान प्रवासअसल्यामुळे त्यांच्यासोबत डॉक्टरांचे पथकही असण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील नामांकित इस्पितळात मुख्यमंत्र्यांवर उपचार होतील.
गेले सुमारे २० दिवस मुख्यमंत्री आजारी आहेत.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे गोवा वैद्यकीय

महाविद्यालयात ते उपचारासाठी गेले होते. तिथे काही चाचण्या केल्यानंतर ते घरी परतले. दुसऱ्या दिवशी १५फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा मुख्यमंत्री गोमॅकॉतआले. तिथल्या डॉक्टरांनी उपचारासाठी मुंबईत जाण्याच्या सल्ला दिल्यानंतर ते

 मुंबईला गेले.तिथे लीलावती इस्पितळात काही दिवस उपचार घेतल्यानंतर २२ फेब्रुवारी रोजीसकाळी विशेष विमानाने ते गोव्यात दाखल झाले. त्याच दिवशी दुपारी विधानसभेत येऊन त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. मंत्री, आमदारांची बैठक घेऊन ते पुन्हा विश्रांतीसाठी घरी गेले. गेल्या आठवड्यात पुन्हा प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गोवा बैठक घेऊन ते पुन्हा विश्रांतीसाठी घरी गेले. गेल्या आठवड्यात पुन्हा प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गोवा

वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. तिथल्या उपचारानंतर घरी परतलेले  मुख्यमंत्री सोमवार ५फेब्रुवारी रोजी मुंबईला गेले होते. आज पहाटे मुंबई ते न्यूयॉर्क विमानाने मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना झाले.५ रोजी मुंबईला रवाना होताना

 मुख्यमंत्र्यांनी एक व्हीडिओ प्रसारित केला होता त्यात आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व गोमंतकीयांचे आभार व्यक्त केले होते. मी बरा होऊन पहिल्या तपासणीसाठी  मुंबईला जात आहेव तिथे डॉक्टरांनी सल्ला दिला तर पूर्ण बरा होण्यासाठी विदेशात जाईन असे म्हटले होते.

 

 

 • राज्यात घटनात्मक पेचप्रसंग
  राज्यपालांनी हस्तक्षेप करावा
  मुख्यमंत्री दीर्घकाळ राज्याबाहेर राहणार असतानाही  मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडे दिला गेला नसल्यामुळे राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला असून राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्वरित हस्तक्षेप करून लोकशाही वाचवावी.
  गोव्यात लोकशाही संपुष्टात आल्यासारखी सध्या परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांचा आजार लवकर बरा व्हावा असे गोवा सुरक्षा मंचासह सर्वांनाच वाटते, परंतु आजाराच्या मुद्यावरून राज्याला वेठीस धरायला कुणाला दिले जाऊ नये. मनोहर पर्रीकर यांना  पर्यायच नाही असे जे काही भाजपने चित्र निर्माण केले आहे तेही ते चुकीचे आहे.  मुख्यमंत्री फायली हाताळू शकत नसल्यामुळे प्रशासन  ठप्प झाले आहे. तशातच ते पुन्हा उपचारासाठी गोव्याबाहेर जात असतानाही मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडे देत नाहीत. त्या ऐवजी संविधानिक संकेत बाजूला सारून तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीलाही मर्यादीत अधिकार देण्यात आले आहेत. एकंदरीत घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असल्यामुळे राज्यपालांच्या त्वरित हस्तक्षेपाची गरज आहे.
  आनंद शिरोडकर
  अध्यक्ष गोवा सुरक्षा मंच