मुख्यमंत्री पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाणार?

0
952
Lilavati Hospital, Mumbai. *** Local Caption *** Lilavati Hospital, Mumbai. express photo

 

गोवा:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वादूपिंडाच्या विकारावरील उपचारासाठी आज पुन्हा मुंबई मधील लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल होणार आहेत.लीलावती मधून डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार पर्रिकर अधिक उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे.मुंबईत जाण्यापूर्वी गोमेकॉ मधून डिस्चार्ज मिळाल्यापासून अडून राहिलेल्या महत्वाच्या फाइल्स आपल्या घरातून क्लियर केल्या आहेत.पर्रिकर यांची तब्बेत सुधारत असून ते बुधवारी होणारी मंत्रीमंडळ बैठक घेण्याची शक्यता कालच भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी बोलून दाखवली होती.तेंडुलकर यांनी 2 दिवसांपूर्वी पर्रिकर यांची भेट घेऊन पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा केली होती.आज पर्रिकर मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रशासकीय कामे हाता वेगळी करणार असून भाजपच्या आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सकाळी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा आणि प्रधान सचिव यांना आपल्या दोनापावल येथील निवासस्थानी बोलावून राज्यातील महत्वाच्या कामांच्या संदर्भात आदेश दिले.