मुख्यमंत्री पर्रीकरांवर गोमेकॉत उपचार सुरु,आज डिस्चार्ज मिळणार

0
1012
 गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शुक्रवारी रात्री उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर जीआय एंडोस्कोपी करून ४८ तास देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती असल्याचे मुख्यमंत्री कार्यालया कडून कळवण्यात आले आहे.
Hon’ble Chief Minister taken to Goa Medical College for upper GI endoscopy.  His health condition continues to be stable.
Will remain there under observation for around 48 hours.
— CMO
 
मुख्यमंत्र्यांना गोमेकॉत दाखल केल्याचे समजताच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत धाव घेत पर्रिकर यांच्या तब्बेतीची चौकशी केली. पर्रिकर यांची तब्बेत स्थीर असून उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी पर्रिकर यांना भेटून आल्या नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.राणे म्हणाले, आपण पर्रिकर यांच्याशी बोललो.पर्रिकर यांच्यावर कोणतीही सर्जरी किंवा एंडोस्कोपी झालेली नाही.नियमित तपासणीसाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही.पर्रिकर यांनी आपल्याला घरी जायला सांगितले असून ते डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहेत.उद्या त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो.

दोन दिवसांपूर्वी पर्रिकर यांची प्रकृती थोड़ी बिघड़ली होती.काही काळ त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले होते.त्यानंतर त्यांची प्रकृती स्थीर होती.काल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन 26 फाइल्स क्लियर केल्या होत्या.आज सायंकाळी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट घेऊन मडगाव मधील विकास कामांबाबत चर्चा केली होती.त्यानंतर पर्रिकर यांची तब्बेत स्थीर असल्याचा निर्वाळा सरदेसाई यांनी दिला होता.त्याला काही तास उलटायच्या आतच पर्रिकर यांना गोमेकॉ मध्ये दाखल करावे लागले आहे.