मुख्यमंत्री पर्रिकर अमेरीकेतून गोव्यात दाखल; विरोधक आक्रमक

0
1529
कॉंग्रेस शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार,शिवसेनेची सरकार विरोधात डिचोली मधून स्वाक्षरी मोहीम सुरु
गोवा खबर :मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज सायंकाळी गोव्यात पोचले.पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राज्यात राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.विरोधी पक्ष काँग्रेससह शिवसेनेने देखील आजारी मंत्रीमंडळामुळे राज्यातील प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत भाजप आघाडीला घेरण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहेत.त्यातच काँग्रेसचे 5 आमदार भाजप मध्ये तर भाजपचे 3 आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या आणि नेतृत्व बदलाच्या चर्चा जोर धरु लागल्या असल्याने मुख्यमंत्री पर्रिकर 2 दिवस अगोदर गोव्यात पोचले असल्याची चर्चा आहे.

उपचारासाठी अमेरिकेस गेलेले मुख्यमंत्री पर्रिकर काल मध्यरात्री  अमेरिकेतुन भारतात यायला निघाले.  आज दुपारी 3 वाजता ते मुंबईत पोचले.तेथून सव्वा चारच्या विमानाने सायंकाळी 6 वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले.पर्रिकर विमानतळावरुन थेट दोनापावल येथील आपल्या खाजगी निवासस्थानी पोचले. जेटलॅगमुळे आज मुख्यमंत्री विश्रांती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राज्यात राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.विरोधी पक्ष काँग्रेससह शिवसेनेने देखील आजारी मंत्रीमंडळामुळे राज्यातील प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत भाजप आघाडीला घेरण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहेत.त्यातच काँग्रेसचे 5 आमदार भाजप मध्ये तर भाजपचे 3 आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या आणि नेतृत्व बदलाच्या चर्चा जोर धरु लागल्या असल्याने मुख्यमंत्री पर्रिकर 2 दिवस अगोदर गोव्यात पोचले असल्याची चर्चा आहे.
उपचारासाठी अमेरिकेस गेलेले मुख्यमंत्री पर्रिकर काल मध्यरात्री  अमेरिकेतुन भारतात यायला निघाले.  आज दुपारी 3 वाजता ते मुंबईत पोचले.तेथून सव्वा चारच्या विमानाने सायंकाळी 6 वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले.पर्रिकर विमानतळावरुन थेट दोनापावल येथील आपल्या खाजगी निवासस्थानी पोचले. जेटलॅगमुळे आज मुख्यमंत्री विश्रांती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियोजित कार्यक्रमानुसार 8 सप्टेंबर रोजी पर्रिकर गोव्यात पोचणार होते.मात्र त्यांच्या गैरहाजरीत घडणाऱ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी 2 दिवस अगोदर येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे उचित समजले असावे असे सूत्राचे म्हणणे आहे.
पर्रिकर मुंबई येथुन अमेरिकेस जाण्याच्या दिवसा पासून राजकीय घडामोडी वेग घेऊ लागल्या होत्या.पर्रिकर यांच्या गैरहजेरीत पर्यायी नेतृत्व तयार करण्याच्या विषयावर पर्रिकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे हा विषय पुढे सरकू शकला नव्हता.मात्र पर्रिकर यांच्या गैर हजेरीचा फायदा उठवत काँग्रेसने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्याने भाजपला त्याची दखल घ्यावी लागली होती.दरम्यानच्या काळात काँग्रेसचे 5 आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.आज काँग्रेसने भाजपचे 3 आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावा करत राजकीय वातावरण गढुळ केले आहे.उद्या मुख्यमंत्री गोव्यात पोचल्या नंतरच या चर्चाना पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची सरकार विरोधात डिचोली मधून स्वाक्षरी मोहीम सुरु
पर्रिकर गोव्यात पोचले तरी विरोधक शांत झालेले नाहीत.आजारी विधानसभा बरखास्त करून लोकांना तंदुरुस्त लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी द्या, अशी मागणी करत शिवसेनेने आज भाजप आमदार प्रतिनिधित्व करत असलेल्या डिचोली मतदारसंघातून स्वाक्षरी मोहीम सुरु केली. शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले,सरकार विरोधात लोकांच्या मनात असलेला असंतोष खदखदत आहे.प्रशासन ठप्प झाल्याने लोकांची कामे होत नाहीत,कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही.
कॉंग्रेस शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार
काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ उद्या दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सध्याच्या सरकारच्या अकार्यक्षमते बाबत हस्तक्षेप करा आणि परिस्थिती सुधारा अशी मागणी करणार आहे.अमेरिकेत उपचार घेऊन परतलेले  मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार कसा घेतात आणि प्रलंबित असलेले प्रश्न कसे तडीस लावतात याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.