मुख्यमंत्री पर्रिकर अमेरीकेतून उद्या पोचणार गोव्यात

0
1303

गोवा खबर :मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.काँग्रेसचे 5 आमदार भाजप मध्ये तर भाजपचे 3 आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या आणि नेतृत्व बदलाच्या चर्चा जोर धरु लागल्या असल्याने मुख्यमंत्री पर्रिकर 2 दिवस अगोदर गोव्यात पोचणार आहेत.
उपचारासाठी अमेरिकेस गेलेले मुख्यमंत्री पर्रिकर आज मध्यरात्री अमेरिकेतुन निघणार असून उद्या दुपारी 3 वाजता ते मुंबईत पोचणार आहेत.तेथून सव्वा चारच्या विमानाने सायंकाळी 5 वाजता गोव्यात येणार आहेत.नियोजित कार्यक्रमानुसार 8 सप्टेंबर रोजी पर्रिकर गोव्यात पोचणार होते.मात्र ज्यात त्यांच्या गैरहाजरीत घडणाऱ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी 2 दिवस अगोदर येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे उचित समजले असावे असे सूत्राचे म्हणणे आहे.
पर्रिकर मुंबई येथुन अमेरिकेस जाण्याच्या दिवसा पासून राजकीय घडामोडी वेग घेऊ लागल्या होत्या.पर्रिकर यांच्या गैरहजेरीत पर्यायी नेतृत्व तयार करण्याच्या विषयावर पर्रिकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे हा विषय पुढे सरकू शकला नव्हता.मात्र पर्रिकर यांच्या गैर हजेरीचा फायदा उठवत काँग्रेसने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्याने भाजपला त्याची दखल घ्यावी लागली होती.दरम्यानच्या काळात काँग्रेसचे 5 आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.आज काँग्रेसने भाजपचे 3 आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावा करत राजकीय वातावरण गढुळ केले आहे.उद्या मुख्यमंत्री गोव्यात पोचल्या नंतरच या चर्चाना पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे.