मुख्यमंत्री पर्रिकरांचा जोश पाहुन राहुल गांधी थक्क

0
1319
राहुल गांधींनी केली  विधानसभेत जाऊन केली मुख्यमंत्र्यांच्या तब्बेची चौकशी
गोवा खबर:गेले 2 दिवस विश्रांतीसाठी गोव्यात असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विधानसभेत येऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्बेतीची चौकशी करत लवकर बरे व्हा,अशी सदिच्छा व्यक्त केली.

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले.गंभीर आजारी असून देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर या अधिवेशनाला उपस्थित असल्याने सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे लागून राहिले होते.गोव्यात सुट्टीवर आलेले राहुल गांधी हे देखील त्याला अपवाद ठरले नाहीत.स्वादुपिंडाचा कॅन्सर झालेला असून देखील ज्या जोशाने मुख्यमंत्री काम करत आहेत ते पाहुन राहुल गांधी देखील थक्क झाले.

राज्यपालांच्या अभीभाषणा नंतर विधानसभेचे कामकाज संपताच विधानसभेच्या मागील बाजूने राहुल गांधी आत आले.त्यांनी पहिल्या मजल्या वरील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्बेतीची आस्थेने चौकशी करत लवकर बरे व्हा,अशी सदिच्छा व्यक्त केली.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राहुल गांधी यांची भेट सदिच्छा होती.तब्बेत इतकी खालावली असताना देखील तुम्ही हे सगळे कसे करता असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला.त्यावर पर्रिकर यांनी आपला हा स्वभाव असून आपण जे ठरवतो ते करतो त्यामुळे आपल्याला त्याची सवय झाली असल्याचे पर्रिकर यांनी गांधी यांना सांगितले.राहुल यांनी आपल्या आईच्या वतीने पर्रिकर यांना शुभेच्छा देताना दिल्ली मधील प्रदूषणाला कंटाळून आपण हवा पालट करण्यासाठी गोव्यात अधून मधून येत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतल्या नंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या विनंतीला मान देऊन विरोधी पक्षाच्या दालनात जाऊन काँग्रेस आमदारांची भेट घेतली.पुढच्या महिन्यात राजकीय भेटीवर गोव्यात येणार असल्याचे त्यांनी काँग्रेस आमदारांना सांगितले.
 कालच राहुल गांधी यांनी राफेल ऑडीओ क्लिप वर अद्याप कोणतीच करवाई झाली नसल्याने त्या क्लिप मधील माहिती खरी आहे अस म्हणायला वाव असल्याचे ट्वीट करत मुख्यमंत्री पर्रिकर यांना चिमटा काढला होता.