मुख्यमंत्री दिल्लीत उपचार घेऊन गोव्यात परतले

0
956
गोवा खबर : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत.

मनोहर पर्रीकर हे 31 जानेवारी रोजी गोवा विधानसभेच्या 3 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये आरोग्याच्या तपासणीसाठी गेले होते. 7 दिवस मनोहर पर्रीकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिका-याने सांगितले.