मुख्यमंत्री जेव्हा घुमट वाजवत आरतीत सहभागी होतात

0
908
गोवा खबर:गोव्यात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविक एकमेकांच्या गणेश मूर्तीच दर्शन घेऊन शुभेच्छाचे आदान प्रदान करत आहेत.

सोमवारी सायंकाळी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पाळी-कोठंबी येथे गणेश दर्शनासाठी आले त्यावेळी  मुख्यमंत्री आणि लोबो यांनी घुमट वाजवत आरती म्हणत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
मुख्यमंत्री झाल्या नंतर प्रमोद सावंत यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव खास असाच आहे.दरवर्षी मी माझ्या मतदार संघासाठी गणरायाला साकडे घालत होतो.यंदा राज्यातील सगळी विघ्ने दूर होऊन राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जावो,असे साकडे गणपतीला घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्री उत्तर गोव्यातील आपल्या पाळी-कोठंबी येथील मुळ घरी मुक्काम ठोकुन आहेत.
सोमवारी सायंकाळी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.
लोबो ज्यावेळी आले त्याच वेळी आरती करणारी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या घरी आली.लोबो यांनी घुमट वाजवण्याची इच्छा व्यक्त करताच मुख्यमंत्री देखील त्यांना साथ देण्यास तयार झाले.
लोबो आणि मुख्यमंत्री दोघेही आरती करणाऱ्या मंडळीं सोबत गणपती समोर बसून घुमट आणि तबल्यावर साथ देत आरत्या म्हणण्यात तल्लीन झाले.घूमटाला नुकताच राज्य लोकवाद्य म्हणून दर्जा मिळाला आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी त्यावर थाप मारत त्याला आणखी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे…