मुकेश कुमार गुप्ता आणि राज कुमार यांची एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

0
858

 

गोवा खबर:मुकेश कुमार गुप्ता आणि राज कुमार यांची भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मुकेश कुमार गुप्ता हे कार्यकारी संचालकपदी कार्यरत होते. त्यांनी भोपाळचे विभागीय व्यवस्थापक, मुंबई येथे प्रादेशिक विपणन व्यवस्थापक, अमृतसर आणि हैदराबाद येथे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अशा महत्वाच्या पदांवर काम केले आहे.

 

राज कुमार यांनी यापूर्वी कार्यकारी संचालक (आंतरराष्ट्रीय व्यवहार), मुख्य कार्यकारी अधिकारी, एलआयसी म्युचूअल फंड, भोपाळचे विभागीय व्यवस्थापक, मनुष्यबळ विभागाचे संचालक तसेच गोरखपूर आणि जयपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक या पदांवरील कामाचा अनुभव आहे.