मुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू

0
876
गोवा खबर:अनेक वर्षे मागणी असलेला मुंबई गोवा महामार्ग कामाला सुरुवात झाली असून कोरोना काळात हे काम पूर्णतः ठप्प झाले होते.आता उरलेली कामे वेगाने पूर्ण करा,अशी मागणी खासदार सुरेश प्रभू यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांच्याकडे केली. 
कोकणातील सामान्य माणसांच्या दळणवळणाच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग क्र.77च्या  कामाच्या प्रगतीबाबत आज सुरेश प्रभू यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.चर्चेत धीम्या गतीने हे चालू असून लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.तसेच वाढते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे मत माजी रेल्वे मंत्री खासदार सुरेश प्रभु यांनी व्यक्त केले.
त्याची दखल घेत तात्काळ राष्ट्रीय महामार्गाची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.