गोवा खबर:मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन सी लिंक प्रोमनेड येथे 21 जून 2018 रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2018 सोहळ्यात उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणारे आहेत.
मुंबईतल्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखिल उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य आणि मन:शांतीसाठी योगासनांचे होणारे फायदे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाल्यानंतर दरवर्षी जगभरात अनेक देशांमध्ये योगासनांच्या लाभांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
‘शांततेसाठी योगा’ ही या वर्षीची संकल्पना आहे.