मुंबईच्या रुग्णालयात लागलेल्या आगीत बळी गेलेल्यांना केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून नुकसान भरपाईची घोषणा 

0
986

 गोवा खबर:मुंबईतल्या ईएसआयसी रुग्णालयात काल लागलेल्या आगीत बळी गेलेल्यांना केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर दुखापत झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख आणि किरकोळ जखमा झालेल्यांना 1 लाख रुपये नुकसान-भरपाई देण्यात येणार आहे.

या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी आणलेल्या सामानाला आग लागून रुग्णालय भस्मसात झाले. आगीच्या धुरामुळे जीव गुदमरुन आठ जणांचा मृत्यू झाला तर 158 जण जखमी झाले. त्यापैकी 57 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

श्रम मंत्रालयाने ईएसआयसी रुग्णालयासोबत बैठक घेऊन पीडितांना तातडीने सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.