मी दयानंद रघुनाथ सोपटे.. सोपटे यांनी घेतली मराठी मधून शपथ

0
1121
गोवा खबर:मी दयानंद रघुनाथ सोपटे… मांद्रे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या दयानंद सोपटे यांनी आज मराठी मधून आमदारकीची शपथ घेतली.भाजपच्या सुभाष शिरोडकर यांनी कोकणी मधून  शपथ घेतली.काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरात आणि भाजपच्या जोशुआ डिसोझा यांनी इंग्रजी मधून शपथ घेतली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये विजयी झालेल्या चार आमदारांनी आज पर्वरी येथील विधान सभा भवनातील पीएसी सभागृहात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात आमदारकीची शपथ घेतली.
हंगामी सभापती मायकल लोबो यांनी चारही नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ दिली.
मांद्रे मधून भाजपच्या दयानंद सोपटे, म्हापसा मधून भाजपच्या जोशुआ डिसोझा, पणजी मधून काँग्रेसच्या बाबुश  मोन्सेरात आणि शिरोडा मधून भाजपच्या सुभाष शिरोडकर यांनी आज शपथ घेतली.
सोपटे यांनी मराठी मध्ये,शिरोडकर यांनी कोकणीत तर मोन्सेरात आणि डिसोझा यांनी इंग्रजी मधून  शपथ घेतली.
गोव्यात लोकसभे बरोबर विधानसभेच्या चार पोटनिवडणुका पार पडल्या होत्या.माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजीची,माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे म्हापशाची तर दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका पार पडल्या होत्या.मांद्रे,म्हापसा आणि शिरोडयात भाजप तर राजधानी पणजी मध्ये भाजपचा 25 वर्षांचा गड काबिज करून काँग्रेसने विजय मिळवला आहे.आज नवनिर्वाचित आमदारांनी छोटेखानी समारंभात आमदारकीची शपथ घेतली.