मीरामार येथे रुतुन बसलेल्या जहाजाला भगदाड; पर्यावरणाला धोका वाढला

0
1009

मीरामार किनाऱ्यावर रुतुन बसलेले लकी सेव्हन हे कॅसिनो जहाज तेथून हटवण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.या जहाजाला भगदाड पडले असून ते आता रिव्हर प्रिन्सेस तर ठरणार नाही ना अशी भीती पणजीवासियांना सतावू लागली आहे.
दरम्यान,कॅसिनो जहाज तांत्रिक अडचणींमुळे मिरामार येथून हटवण्यास विलंब होत असून लवकरच उपाययोजना केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.हे जहाज जास्त दिवस किनाऱ्यावर रुतुन बसले तर पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिरामार येथे रुतलेल्या लकी सेव्हन जहाजाला भगदाड पडल्याने हे जहाज हटवण्याच्या कार्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र, त्यावर उपाययोजना करून लवकरच हे जहाज हटवले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
जहाज हटवण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे नमूद करताना, सद्यस्थितीत जहाज हटवण्याचा प्रयत्न केल्यास ते बुडण्याची शक्यता असून, दुरुस्तीनंतर ते त्वरित हटवले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.