मि विदा आयुष क्वाथचे राज्यपालांच्या हस्ते उद्धाटन

0
1169

गोवा खबर:कोविड संकटाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुषच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गोव्यात उत्पादीत मि विदा आयुष क्वाथचे आज राज्यपाल सत्यपाल मलिक आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज उद्धाटन करण्यात आले.

राजभवनमध्ये पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉ. स्नेहा भागवत आणि मि विदाच्या पार्टनर अमृता पिंटो उपस्थित होते.

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बनवण्यात आलेला आयुष क्वाथ छोट्या चहाच्या पाऊच स्वरूपात उपलब्ध असून राज्यात सर्वत्र लवकरच हे उत्पादन उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती डॉ. भागवत यांनी आपल्या प्रास्ताविकात करून दिली.

मि विदा आयुष क्वाथचे उद्धाटन केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले,आता पर्यंत अशा प्रकारची उत्पादने गोव्या बाहेर बनवली जात होती.आता गोव्यात महिला उद्योजकीने त्यांचे उत्पादन सुरु केले असून ही कौतुकास्पद बाब आहे.
राज्यपाल मलिक यांनी भागवत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील यावेळी ऊर्जा वेलनेस सेंटरच्या मि विदा आयुष क्वाथच्या उत्पादनांना लोकांचा चांगला प्रतिसाद लाभेल आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतील,असा विश्वास व्यक्त केला.