मिस इंडिया २०१९ चा शोध सुरू – ही वेळ आहे गोयंकरांना अभिमान वाटायला लावण्याची

0
1158

 

गोवन सौंदर्यवतींना राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची मोठी संधी

 

  • मिस इंडिया निवडीसाठी ग्राहय ३० राज्यांत गोव्याचा (पश्चिम विभाग) समावेश
  • १५ मार्च रोजी एफबीबी/बिग बझार, मॉल दे गोवा, गोवा इथे निवड फेरी
  • स्पर्धकांना मिळणार नेहा धुपिया आणि दिया मिर्झा यांचे मार्गदर्शन

 

गोवा खबर: मिस इंडिया २०१९ चा शोध सुरू झाला असून ही वेळ आहे गोवन सौंदर्यवतींना धमाल- मस्ती, शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन या संधीचा वापर सर्वात छोट्या राज्याला आपल्या मोठ्या देशावर वर्चस्व गाजवत “मिस इंडिया २०१९” चा मान मिळवण्याची!

 

तरुण, गुणवान मुलींचे आयुष्य बदलवून टाकण्याची परंपरा असलेली मिस इंडिया २०१९ ही स्पर्धा आपली परंपरा पुढे सुरू ठेवत नव्या पिढीला संपूर्ण पाठिंबा देणार आहे आणि प्रचंड क्षमता असलेल्या गोवन स्त्रीला आघाडी घेत भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची आशा निर्माण झाली आहे.

 

मिस इंडियाची निवड फेरी होणार असलेल्या ३० राज्यांत गोव्याचा (पश्चिम विभाग) समावेश आहे. निवड फेरी १५ मार्च रोजी एफबीबी/बिग बझार, मॉल दे गोवा, गोवा इथे होणार आहे.

 

विजेतीला विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल, तर इतर जणींना मिस ग्रँड इंटरनॅशनल आणि मिस युनायटेड काँटिनेंट्स अशा आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करता येईल.

 

प्रत्येक राज्यातील पहिल्या तीन स्पर्धकांना राज्याच्या झोनल क्राउनिंग समारंभात जायची संधी मिळणार असून हा कार्यक्रम बेंगळरू (दक्षिण विभाग) येथे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी, दिल्ली (उत्तर विभाग) येथे ६ मार्च २०१९ रोजी, पुणे (पश्चिम विभाग) येथे २ एप्रिल २०१९ रोजी आणि कोलकाता (पूर्व विभाग) आणि २३ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. प्रत्येक राज्याची विजेती जूनमध्ये होणार असलेल्या अंतिम फेरीत सहभागी होईल.

 

मात्र, त्यापूर्वी स्पर्धकांना या क्षेत्रातील सर्वोत्तम मान्यवरांच्या अतिशय कठोर प्रशिक्षणातून जावे लागेल. नेहा धुपिया आणि दिया मिर्झा मुलींना मार्गदर्शन करतील. नेहा पूर्व आणि पश्चिम विभागातील मुलींना मार्गदर्शन करतील, तर दिया उत्तर व दक्षिण विभागावर देखरेख करतील.

 

याविषयी दिया मिर्झा म्हणाल्या, ‘मिस इंडिया स्पर्धेने माझ्या आयुष्याला वेगळे वळण दिले आणि या मुलींच्या आयुष्यातही तसंच होईल याची मला आशा आहे. मिस इंडियाची परंपरा असामान्य आहे. या मुलींना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी मी सर्वोतपरी मदत करेन. मला खात्री आहे, की मिस इंडिया ही स्पर्धा सर्व स्पर्धकांच्या आयुष्यात नवं वळण ठरेल.’

 

नेहा धुपिया म्हणाल्या, मी माझा प्रवास मिस इंडियापासून सुरू केला आणि तेव्हापासूनच या स्पर्धेशी कधी न संपणारं नातं तयार झालं आहे. प्रत्येकवर्षी मी नव्या, उत्साही आणि महत्त्वाकांक्षी मुलींना या स्पर्धेत मिस इंडिया जिंकण्याचं व प्रतिष्ठित विश्वसुंदरी स्पर्धेत भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याचं स्वप्न घेऊन येताना पाहते. यावर्षी मानुषीची परंपरा पुढे नेणाऱ्या मुलीला शोधण्यास मी उत्सुक आहे.

 

सहा विश्वसुंदरी स्पर्धांमध्ये भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी रिटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय- बच्चन (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) आणि मानुषी छिल्लर (२०१७) यांनी केली असून त्यांनी १७ वर्षांनंतर हा प्रतिष्ठित मुकुट देशात परत आणला. आता हा मुकुट आत्मविश्वासाने धारण करू शकणारीचा शोध सुरू झाला असून पुढची कदाचित आपल्या राज्यातून असू शकेल.

 

राज्यातील निवड फेरीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत –

 

जन्म राज्य – तिच्या जन्मदाखल्यावर राज्याचा उल्लेख हवा.

सध्याचे राज्य – सध्या ती कोणत्या राज्यात शिकत आहे किंवा नोकरी करत आहे किंवा राहात आहे त्याचा उल्लेख हवा.

मूळ राज्य – ज्या राज्यात तिचा जन्म झाला किंवा तिच्या पालकांपैकी कोणीतरी एक तिथे राहात/शिकत/नोकरी करत किंवा जन्मलेले आहे.

 

मुलींसाठी सहभागाचे निकष पुढीलप्रमाणे आहेत –

 

  • उंचीचा निकष – ५.५ आणि पुढे
  • वय – १८- २५ (३१ डिसेंबर २०१९ नुसार २५)
  • २६ आणि २७ वर्ष वय केवळ रनर अप स्थानासाठी ग्राहय धरले जाईल.
  • ओसीआय कार्डधारकही रनर अप स्थानासाठी ग्राहय धरले जाईल.

 

मिस इंडिया २०१९ च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना जूनमध्ये होणार असलेल्या भव्य अंतिम फेरीच्या आधी या क्षेत्रातील सर्वोत्तम तज्ज्ञांकडून कडक प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास सत्रांतून जावे लागणार असून हा सोहळा कलर्सवर प्रसारित केला जाणार आहे.

 

अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांसाठी समग्र दृष्टीकोन ठेवला जाणार असून विजेत्यांना प्रसिद्धीशिवाय एक कोटी व त्यापेक्षा जास्त रकमेचे रोख बक्षिस मिळवण्याची संधी आहे.

 

तेव्हा सुसेगात राहू नका आणि तुमचं व्यक्तिमत्त्व, गुण आणि ज्ञान दाखवा!आपल्या घरी मुकुट आणण्याची ही मोठी संधी आहे.

 

अर्ज करा. लॉग ऑन कराwww.missindia.inआणि तुमचे फोटो व प्रोफाइल मेल करा missindiaorganization@gmail.com