‘मिफ्फ’ची व्याप्ती अधिक वाढावी यासाठी प्रयत्न सुरू

0
527

गोवा खबर:मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची व्याप्ती अधिक वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मिफ्फच्या महोत्सव संचालक स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले. गोव्यातील पणजी येथे सुवर्ण महोत्सवी इफ्फी महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हिजनच्या महासंचालकही शर्मा आहेत.

 

मिफ्फ अधिक चांगला, वेगळा आणि सर्वसमावेशक महोत्सव करण्यासाठीच्या विविध नव्या उपक्रमांची माहिती शर्मा यांनी दिली.

मिफ्फ 2020 मध्ये अनेक आकर्षणे असतील. चित्रपटकर्ते आणि चित्रपटरसिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटातल्या सर्वोत्तम बुद्धीमत्तेला मिफ्फमध्ये वाव मिळतो, असे त्यांनी सांगितले.

यंदाच्या मिफ्फचे उद्‌घाटन 28 जानेवारी 2020 ला मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये  होणार आहे तर समारोप 3 फेब्रुवारीला होणार आहे.