मिडीया जाहिरातींचे निरिक्षण करण्यास समितीची स्थापना

0
903

 गोवा खबर:०१-मांद्रे विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक आणि २०१९ लोकसभेच्या सामान्य निवडणूकांच्या अनुषंगाने निवडणूक उमेदवारासंबंधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित होणार्‍या राजकीय स्वरुपाच्या जाहिरातींचे निरीक्षण करण्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे.

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. लेविसन मार्टिन्स अध्यक्ष तर उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-१  विकास गावणेकर, पर्यावरण पत्रकार  गुरुदास सावळ, पणजी दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम कार्यकारी  उदय कामत, एम आणि सी चे सहाय्यक संचालक  बी. व्ही. प्रभुगांवकर, माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे माहिती अधिकारी  प्रकाश नाईक सदस्य असतील.

पेड बातम्यांच्या तक्रारी/समस्यांचे परिक्षणही समितची करणार असून निवडणूक प्रक्रियेत पुढील आदेशापर्यंत आवश्यक असेल तेव्हा भेट देतील.