मिठाईच्या योग्य वापरासंबंधी तारीख प्रदर्शित करण्याचा आदेश 

0
150
 गोवा खबर:भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणिकरण प्राधिकरणाने दुकानातून विक्री करण्यात येणा-या पॅक न केलेल्या तसेच किरकोळ डब्यातून, ट्रेमध्ये भरून ठेवलेली मिठाई खाण्यास व वापरण्यास कितपर्यंत चांगली व योग्य आहे यासंबंधी तारीख प्रदर्शित करणे गरजेचे आहे अशी माहिती गोवा सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने दिली आहे. लोक हितासाठी हा आदेश १ ऑक्टोबर  पासून लागू करण्यात आला आहे.
दुकानदारांनी या व्यतिरिक्त हा आदेश बंधनकारक नसला तरी मिठाई तयार केलेली तारीख प्रदर्शित करावी. मिठाईचा प्रकार, स्थानिक वातावरण आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन मिठाई वापराच्या योग्यतेची तारीख प्रदर्शित करावी, पारंपारिक दूधापासून तयार करण्यात येणारी मिठाई खाण्यास, वापरण्यास कितीकाळ योग्य आहे यासंबंधीची माहिती एफएसएसआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मिठाईचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकानी या आदेशाचे पालन करावे तसेच सर्व राज्य आणि संघ प्रदेशाचा अन्न सुरक्षा यंत्रणेला या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देतो.