मिग 29 के गोव्याच्या समुद्रात कोसळले; पायलट बचावला;चौकशीचे आदेश

0
523
गोवा खबर:नौदलाचे मिग 29 के विमान आज गोव्याच्या किनाऱ्या पासून 25 ते 30 सगरी मैल अंतरावरील खोल समुद्रात कोसळले. सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली.नियमित सराव सुरु असताना ही घटना घड़लीअसुन विमानाचा चालक अपघातावेळी विमानातून बाहेर पडल्याने बचावला आहे. त्याला सुखरूपपणे वाचवण्यात यश आले आहे.

या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती नौदलाच्या ट्विटर हैन्डल वरुन  देण्यात आली आहे.
 या पूर्वी 16 नोव्हेंबर 2019 वेर्णा अौद्योगिक वसाहतीत असेच सरावावेळी विमाला पक्षी आदळून अपघात झाला होता.विमान कोसळण्यापूर्वी  दोन्ही पायलट वेळीच बाहेर पडल्यामुळे वाचले होते.त्यानंतर आज पुन्हा आणखी एक मिग 29 के विमान कोसळले आहे.
अपघातग्रस्त मिग 29 के विमान दाबोळी येथील नौदलाच्या हंसा तळावर तैनात होते.आज समुद्रात विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवरुन नियमित सरावासाठी उड्डाण केल्या नंतर हे विमान समुद्रात कोसळले. विमान कोसळत असताना त्यातील पायलट वेळीच बाहेर पडल्याने बचावला.त्याला समुद्रातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नौदलाच्या सूत्रांनी दिली आहे.
अपघाताची सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नसली तरी अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.