
गोवा खबर:माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे सचिव रूपेश कुमार ठाकूर यांनी संवादाने लोकांमध्ये संस्थेसंबंधी सकारात्मक प्रतिमा तयार करणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्य़ाचे सांगितले. पर्वरीतील सचिवालयात संपन्न झालेल्या राज्य सरकारी खाते आणि स्वायऱ्त संस्थेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यसत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माहिती आणि प्रसिध्दी खात्याने सदर कार्यशाळेचे अयोजन केले होते.
पुढे बोलताना ठाकूर यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लोकांना समजून घेतले पाहिजे असे सांगून सामाजिक माध्यमाना संदेश देताना सरकारासंबंधी लोकांमध्य़े सदिच्छा आणि विश्वास निर्माण केला पाहिजे असे सांगितले. ठाकूर यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना सामाजिक माध्यमाचा लाभ घेण्याचा सल्ला दिला.
कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार अश्विन तोंबट, यांनी “इंट्रोडक्शन टू पब्लीक रिलेशन्स टूल्स ॲड प्रॅक्टीसीस” या विषयावर भाषण केले. पत्रसूचना कार्यालयाचे उपसंचालक विनोद कुमार डी. व्ही. आयआयएस यांनी “सरकारासाठी प्रभावी संवाद” या विषयावर भाषण केले.
गोवा शिपयार्डचे जनसंपर्क अधिकारी निखील वाघ यांनी “बाह्य जनसंपर्क संस्था निर्माण करणे” या विषयावर तर कोंकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी लिवरा डिकुन्हा यांनी “माध्यम संबंध चांगली प्रसिध्दी मिळविणे आणि खराब प्रसिध्दीस नकार देणे” या विषयाची माहिती दिली.
सुरवातीस माहिती संचालिका मेघना शेटगांवकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात, आपल्या खात्यासंबंधी चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजाविण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांना माहिती देण्याच्या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. माहिती अधिकारी जॉन आगियार यांनी आभार मानले. शाम गांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.