माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालकपदाचा कार्यभार  मिश्रा यांनी स्वीकारला

0
937

 

 

गोवा खबर:भारतीय सूचना सेवेचे अधिकारी (1988 तुकडी) आर. एन. मिश्रा यांनी आज पश्चिम विभागाचे महासंचालक म्हणून पत्र सूचना कार्यालय मुंबई येथे पदोन्नतीवर पदभार स्वीकारला आहे.  मुत्‍थुकुमार यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर श्री. मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे.

भारतीय सूचना सेवेतील आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत  मिश्रा यांनी आकाशवाणी तसेच दूरदर्शन दिल्लीच्या वृत्तसेवा विभाग, पत्र सूचना कार्यालय श्रीनगर आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अन्य विभागात कार्य केले आहे. ते काठमांडू येथे प्रसार भारतीचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत होते. महासंचालकपदी रूजू होण्यापूर्वी  मिश्रा पत्र सूचना कार्यालय रायपूरचे प्रमुख म्हणून अतिरिक्त महासंचालकपदाचे कामकाज बघत होते.

मिश्रा हे पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, दमण आणि दीव तसेच दादरा नगर हवेली येथील पत्र सूचना कार्यालये तसेच लोक संपर्क आणि संचार ब्यूरो कार्यालयांचे प्रमुख या नात्याने कामकाज बघतील.

पत्र सूचना कार्यालय मुंबईचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक श्री. नितीन वाकणकर यांनी आर. एन. मिश्रा यांचे स्वागत केले.