माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्राचे महासंचालक म्हणून मनीष देसाई यांनी पदभार स्वीकारला

0
539

 

 

 

गोवा खबर:भारतीय माहिती सेवा या सेवेचे ज्येष्ठ अधिकारी मनीष देसाई यांनी आज पत्र सूचना कार्यालय मुंबई येथे माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्राचे महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याआधी ते नवी दिल्लीत रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स ऑफ इंडिया म्हणजेच आरएनआय या पदी कार्यरत होते.

पश्चिम विभागाचे महासंचालक म्हणून मनीष देसाई पश्चिम भारतातल्या संपर्क यंत्रणेचे कामकाज बघतील. या अंतर्गत, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातल्या पत्र सूचना कार्यालय आणि ब्यूरो ऑफ आऊटरिच कम्युनिकेशन-बीओसी विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहतील.

1989 च्या आयआयएसच्या तुकडीचे अधिकारी मनीष देसाई यांनी आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध कार्यालयांमध्ये जबाबदाऱ्या पार पाडल्या.  यात डिएव्हीपी, आकाशवाणी, प्रसार भारती आणि भारतीय जनसंपर्क संस्था यांचा समावेश आहे.

याआधी देसाई यांनी जवळपास एक दशक पीआयबी मुंबईचे संचालक आणि अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम पाहिले. 2016-18 या कालावधीत त्यांच्याकडे फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक पदाचाही कार्यभार होता.