मास्क वापरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शक तत्वे

0
396

 

 

 

1.         परिचय

डिसेंबर 2019 च्या सुरवातीला चीनमध्ये नवीन कोरोना विषाणू या नवीन आजाराची सुरुवात झाली आणि आता हा आजार 90 हून अधिक देशांमध्ये फैलावाला आहे. 9 मार्च 2020 पर्यंत भारतात या आजाराची लागण झालेल्या एकूण 42 प्रकरणांची नोंद झाली असून यातील बहुतांश लोकांनी लागण झालेल्या देशातून प्रवास केला होता. यातील बहुतेक रुग्णांमध्ये ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत. यातील काही लोकांना श्वास घेण्यास अडचण होऊन त्यांना हा गंभीर आजार होऊ शकतो.

कोविड खोकल्याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीद्वारे हा आजार पसरतो आणि खोकताना त्याच्या तोंडातून उडणाऱ्या थुंकीमुळे त्याच्या जवळ असलेल्या (1 मीटरहून कमी अंतर) व्यक्ती त्यामुळे संक्रमित होतात.

खोकल्याशी संबंधित अशा कोणत्याही आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विविध घटकांकडून आणि विशेषतः सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो.

 

2. या लेखाचा उद्देश

सामान्य नागरिकांना मास्क वापरासंदर्भात पुरावा आधारित योग्य माहिती मिळावी हा या लेखाचा उद्देश आहे.

 

3. वैद्यकीय मास्क

बाजारात वेगवेगळ्या आकाराचे वैद्यकीय मास्क उपलब्ध आहेत. सामन्यतः वापरला जाणारा मास्क हा कपड्याचा शिवलेला सपाट 3 ते 4 घड्या    घातलेला असतो जो नाक आणि तोंड झाकतो आणि त्याला नाडी किंवा इलास्टिक असते जे डोक्याच्या पाठीमागे बांधले जाते. झडपेसह (किंवा विना झडप) शंकू किंवा बदकाच्या तोंडाच्या आकाराचे मास्क देखील आहेत जे नाक आणि तोंडासह चेहऱ्याचा बहुतांश भाग झाकतात, परंतु हे मास्क महाग आहेत.

 

4. सामान्य नागरिकांकडून मास्कचा वापर

4.1 कोणतीही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरू नये

कोणतीही लक्षणे नसणाऱ्या निरोगी व्यक्तीने वैद्यकीय मास्क वापरू नये कारण यामुळे सुरक्षिततेचे चुकीचे समज निर्माण होतात आणि त्यामुळे हात धुण्यासारख्या अन्य आवश्यक उपायांकडे दुर्लक्ष केले जाते.

याहीपुढे जाऊन, समाजातील निरोगी व्यक्तीने मास्क वापरल्याने त्यांच्या आरोग्याला त्याचा कोणताही लाभ झाल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही. खरं तर मास्कचा चुकीचा वापर किंवा मास्कचा वापर  अधिक काळ किंवा वारंवार वापर केल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. यामुळे अनावश्यक खर्च देखील होतो.

अशा परिस्थितीत अधिक प्रभावी पाऊले खालीलप्रमाणे:

i. 40 सेकंद साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा. 70% अल्कोहोल असलेले अल्कोहोल आधारित हॅन्ड सॅनिटायझर 20 सेकंद वापरणे गरजेचे आहे. जर हात घाण किंवा मळलेले असतील तर अल्कोहोल आधारित हॅन्ड सॅनिटायझरचा वापर न करता हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.

ii. खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमालाने किंवा पेपर टिशूने झाका.जर रुमाल किंवा पेपर टिशू उपलब्ध नसेल तर खोकताना तोंडावर तुमच्या हाताचे कोपर ठेवा. वापर झाल्यानंतर टिशूची योग्य विलेव्हाट लावा आणि हात धुवा.

iii.  चेहरा, तोंड, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.

iv. खोकणाऱ्या आणि शिंकणाऱ्या व्यक्तीपासून किमान 1 मीटर लांब रहा.

v. आपल्या शरीराच्या तापमानाची नोंद ठेवा.

 

4.2 वैद्यकीय मास्क कधी आणि कुणी वापरावे (आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या कामगारां व्यतिरिक्त)

4.2.1. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा ताप येतो.

आजारी असल्यास तीन लेयरच्या वैद्यकीय मास्कचा वापर केल्यास तुमचा संसर्ग इतरांना होण्यापासून आळा घातला जातो. असे असले तरी देखील दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही तुमचे हात वारंवार धुणे गरजेचे आहे.

4.2.2. आरोग्य सेवा सुविधा केंद्रात जाताना

4.2.3. आजारी माणसाची काळजी घेताना.

4.2.4. संशयित/संसर्ग झालेल्या व्यक्तींची जेव्हा घरातच काळजी घेतली घेतली जाते तेव्हा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी तीन लेयर मास्क चा वापर करावा.

 

4.3 वैद्यकीय मास्कचा प्रभावी वापर कालवधी

योग्य पद्धतीने वापर केलेला वैद्यकीय मास्क 8 तासांपर्यंत प्रभावी असतो. जर या कालावधी दरम्यान तो ओला झाला तर तो तात्काळ दुसरा मास्क वापरावा.

4.4       तीन लेयर मास्क वापरण्याची योग्य प्रक्रिया

वैद्यकीय मास्क वापरताना खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. जर तुम्ही त्याचा अवलंब केला नाही तर तुम्हाला मास्क मुळेच संसर्ग होऊ शकतो.

• प्लेट्स उघडा; त्या खालच्या बाजूला आहेत याची खात्री करून घ्या.

• नाक, तोंड आणि हनुवटीवर ठेवा.

• नाकाच्या उंचवट्यावर लवचिक नोज पीस (सहजपणे दिसणारी धातूची पट्टी) नीट बसवा.

• दोरी नीट बांधा (वरची दोरी कानावरून डोक्यावर आणि खालची दोरी मानेच्या मागे बांधा)

• मास्कच्या दोन्ही बाजूला फट नसल्याची खात्री करून घ्या.

• मास्कचा वापर करत असताना त्याला हात लावणे टाळा.

• मास्क गळ्यात लटकवून ठेऊ नका.

• 6 तासांनी किंवा ओला झाल्यानंतर मास्क बदला.

• डिस्पोजेबल मास्क चा वापर पुन्हा करू नका आणि त्यांची योग्य विलेव्हाट लावा.

• मास्क काढताना त्याच्या दुषित बाह्य भागाला स्पर्श न करण्याची सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे.

• मास्क काढताना आधी खालची दोरी सोडा आणि नंतर वरची त्यानंतर वरची दोरी पकडून मास्क बाजूला करा.

4.5       वापरलेल्या मास्क ची विलेव्हाट लावणे

वापरलेला मास्क संभाव्यतः संक्रमित मानला जातो. रूग्ण / काळजी घेणारे / घरगुती काळजी घेताना जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांनी वापरलेले मास्क सामान्य ब्लीच द्रावण (5%) किंवा सोडियम हायपोक्लोराइट द्रावण (1 %) वापरून निर्जंतुकीकरण करावे आणि नंतर जाळून किंवा खड्ड्यात पुरून विल्हेवाट लावावेत.