मासळी शिवाय गोंमंतकिय जनता गोयकारपण हरवून बसले :शिवसेना

0
990
सरकारने गोमंतकीयांवर जबरदस्तीने श्रावण लादला:कामत
गोवा खबर:गोवा सरकारने गोमंतकियांवर जबरदस्तीने अधिक श्रावणमास लादला असल्याची खरमरीत टीका शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे.
मच्छीमारमंत्री विनोद पालयेकर यांनी गोव्यात येणार्‍या मासळी वाहू वाहनांची तपासणी केली जाणार असल्याची घोषणा काल केली होती पण सरकारने आज बाहेरून येणाऱ्या मासळीवर बंदी घालून स्वत:च्याच मंत्र्यांवर अविश्वास दाखवला असल्याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.
कामत म्हणाले, विश्वजीत राणे यांचा माशांमध्ये नैसर्गीक फॉर्मेलीन असणारा दावा किंवा अन्न आणि औषध प्रशासनाच्या मर्यादित प्रमाणात फॉर्मेलीन असल्याचा दावा फोल ठरवत सरकारने मासळी बंद करून मासळीत प्राणघातक फॉर्मेलीन घालण्यात येत असल्याचे एकप्रकारे मान्य केले  आहे. गोमंतकीयांच्या ताटात फॉर्मेलीन मुक्त मासळी उपलब्ध करून देण्यास सरकार सपशेल अपयशी ठरले असून मासळी शिवाय गोंमंतकिय जनता गोयकारपण हरवून बसले असल्याची टीका कामत यांनी केली आहे.
 आठ पंधरा दिवस विषय थंड होण्याची सरकार वाट पाहत असुन परत मासळी माफियांच्या हाती व्यवसाय देण्याचे षडयंत्र रचत असल्याचा संशय कामत यांनी व्यक्त केला आहे.