मालवाहतुकीद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील

0
834

गेल्या चार दिवसांत रेल्वे, 1 लाख 60 हजार मालवाहतुकीच्या डब्यांद्वारे (वाघिण्याद्वारे)  पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्यात व्यग्र, एक लाख वाघिणींमधून अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा

धान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे, भाज्या, पेट्रोलियम पदार्थ, खते इत्यादी वस्तूंचा भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीद्वारे अबाधितपणे सर्वत्र पुरवठा

 

गोवा खबर:कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लाँकडाऊन असताना, भारतीय रेल्वे मात्र मालवाहतुकीच्या माध्यमातून देशातील नागरिकांना, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधितपणे, करित आहे. देशात सर्वत्र वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी गेल्या 4 दिवसात एक लाख साठ हजार वाघिण्याद्वारे पुरवठा साखळी सुरु ठेवण्यात आली. त्यापैकी एक लाख वाघिण्याद्वारे सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. देशातील सर्व राज्यात लाँकडाऊन असताना नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेचे कर्मचारी गोदामे, रेल्वे स्थानके ,नियंत्रण कक्ष आदि ठिकाणी 24 तास कामावर हजर आहेत, जेणेकरून वस्तूंचा तुटवडा जाणवू नये.

23 मार्च 2020 रोजी 26577 वाघिण्यामध्ये अन्नधान्य, मीठ, खाद्यतेल, साखर, दूध, फळे, भाजीपाला, कांदे, पेट्रोलियम पदार्थ चढविण्यात आले. त्यापैकी 1168 वाघिण्याद्वारे अन्नधान्य, 42 वाघिण्याद्वारे फळे भाजीपाला, 42 वाघिण्याद्वारे कांदे, 42 वाघिण्याद्वारे साखर, 168 वाघिण्याद्वारे मीठ, 20 वाघिण्याद्वारे दूध, 22473 वाघिण्याद्वारे कोळसा, 2322 आणि वाघिण्याद्वारे पेट्रोलियम पदार्थांची ने-आण झाली.

24 मार्च 2020 रोजी एकूण 27742 वाघिण्यापैकी, 1444 मधून अन्नधान्य, 84 मधून फळे भाजीपाला, 168 मीठ, 15 दूध, 50 टँकर मधून खाद्यतेल, 24207 मधून कोळसा, तर 1774 वाहनांतून पेट्रोलियम पदार्थांची ने-आण झाली.

25 मार्च 2020 ला 23 हजार 97 वाघिण्यापैकी 876अन्नधान्य, 42साखर, 42 मीठ, 15 दूध, 20 418 कोळसा, 1704 वाहनांतून पेट्रोलियम पदार्थांची ने-आण करण्यात आली.

26 मार्च 2020 ला एकूण 24 हजार नऊ वाघिण्याद्वारे अत्यावश्यक वस्तूंची नेआण झाली, त्यापैकी 1417 तून अन्नधान्य, 42 मधून साखर, 42 मीठ, 20784 मधून कोळसा, 1724 मधून पेट्रोलियम पदार्थांची नेआण झाली.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात निर्बंध असताना त्या त्या राज्य सरकारांशी समन्वय साधून, उशीर न करता मालाची नेआण व्यवस्थितपणे होईल, याची दक्षता घेतली जात आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखाली, भारतीय रेल्वेद्वारे ,जीवनावश्यक वस्तूंचा विनाव्यत्यय सुरळीत पुरवठा सुरु आहे. रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी देखील यावर जातीने देखरेख करत आहेत.

भारतीय रेल्वेने या कठीण काळात आपली जबाबदारी ओळखून आपल्या सबंधिताना  सहजपणे आणि जलदगतीने मालवाहतूक करण्यासाठी मदत केली आहे.